मराठी राजभाषा दिवस
माझ्या मराठीची बोलू कौतुके
परी अमृतातेही पैजा जिंके
ऐसी अक्षरे रसिके मेळवीण
संत ज्ञानेश्वर महाराज
ज्ञानेश्वरांनी रुजविली ती भाषा मराठी.
शिवरायांनी टिकविली ती संस्कृती मराठी
संतांनी वाढविला तो वाण मराठी
आमची मायबोली आमचा अभिमान मराठी
माय मराठीच्या सर्व लेकरांना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्या
जय महाराष्ट्र
मराठी राजभाषा दिवस हा महान साहित्यिक , कविश्रेष्ठ कुसुमाग्रज ( विष्णू वामन शिरवाडकर ) जन्म दिनां क २७फेब्रुवारी १९१२ दिनी म्हणजेच २७ फेब्रुवारी रोजी दरवर्षी साजरा केला जातो.
कविश्रेष्ठ कुसुमाग्रजा च्या काही कवितेतील ओळी ,
१) कोरूनी गेले मायबोलीला
आमुच्या अंतर्यामी होते .
मराठी मातीतील कुसुमाग्रज
शब्दसृष्टीचे स्वामी होते //१//
२) झालेत बहु, आहेत बहू ,
होतील बहू , सारस्वत दि ग्गज
नभोमंडपी तळपत राहील
अजींक्यतारा कुसुमाग्रज //२//
३) लावणीतल्या मस्तीची , पोवाड्यात पेटत्या वातीची
अभंग ओवी , फलक्याची गझलेत रंगल्या रातीची
कवितेची ,साहित्याची , लोककलांच्या जातीची
माय मराठी आई आमुची , आम्ही मुले मराठी मातीची.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ,
धर्म , पंथ , जात, एक जाणतो मराठी ,
एवढ्या जगात माय मानतो मराठी ,
येथल्या नभातून वर्षते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी ,//३//
सुरेश भट
Comments
Post a Comment